HEMRL Pune Bharti : उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF), रिसर्च असोसिएट (RA)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर दोन्हीसह प्रथम वर्गामध्ये केमिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (M.E/ M.Tech.) पदव्युत्तर पदवीधर असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज संचालक, HEMRL, सुतारवाडी, पुणे-४११०२१ या पत्त्यावर सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 29 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.drdo.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 29 जुलै 2024 आहे, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.