ESIC Pune Bharti 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची भरती केली जाणार आहे. आणि यासाठी कसा अर्ज करण्याचा आहे जाणून घेऊया.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत आहे.
अर्ज पद्धती
या भरती अंतर्गत ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आहे.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज establishpune.amo@gmail.com या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे ४११०३७ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या पदांसाठी अर्ज 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.esic.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-पदांनुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-मुलाखतीचे स्थळ :- ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37 आहे.
-मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
-मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.