ESIC Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे, या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, जे उमेदवार येथे अर्ज करू इच्छित आहेत, त्यांनी लक्षात घ्या येथे, अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने करायचे आहे. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2023 आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ताबडतोब सादर करावेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, अर्ज करण्यापूर्वी एकदा शैक्षणिक पात्रता तपासावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत आहे.
अर्ज पद्धती
येथे ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल ) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
या ईमेल पत्त्यावर establishpune.amo@gmail.com
अर्ज सादर करायचे आहेत.अर्ज पाठविण्याचा पत्ता
उमेदवार, वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. 689/90, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037, या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.esic.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने करायचे आहेत.
-उमेदवारांनी प्रथम ईमेलवर अर्ज पाठवावेत आणि मग दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येतील.
-अर्जासह आवश्यक कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.