FDA Recruitment 2024: अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया?
FDA Recruitment 2024: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने नुकतीच विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही एकप्रकारे मोठी संधी आहे तसेच ज्यांच्याकडे संबंधित शैक्षणिक पात्रता आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
FDA Recruitment 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
एकूण 56 पदांसाठी ही भरती होत आहे.
पद क्र.01:
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (एकूण 37 जागा उपलब्ध)
पद क्र.02: विश्लेषण रसायनिक शास्त्रज्ञ, गट ब (एकूण 19 जागा उपलब्ध)
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:
या भरतीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे:
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक: या पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवी असणे आवश्यक आहे. [(i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी]
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ: या पदासाठी फार्मसी पदवी किंवा रसायन शास्त्र/जीव-रसायन शास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. [फार्मसी पदवी किंवा Chemistry / Bio-Chemistry किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+ 18 महिने अनुभव
वयोमर्यादा:
22 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे.
मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ. या उमेदवारांना: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद (छ. संभाजीनगर)
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/- आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/- अर्ज शुल्क आहे.
या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यांचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.
यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
संपूर्ण माहिती अचूक भरल्यानंतर तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तेथे अपलोड करायचे आहेत.
सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सबमिट बटनावरती क्लिक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
अर्ज हा 22 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता.