जॉब्स

ESIC Pune Bharti 2024 : मुलाखत द्या अन् भरती व्हा! पुण्यातील ESIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “GDMO“ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 15 मे 2024 रोजी हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील जागांसाठी MBBS आणि PG Degree झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

नोकरीचे ठिकाण पुणे येथे आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखतीसाठी उमेदवारांनी ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690, बिबवेवाडी, पुणे-37 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 15 मे 2024 रोजी घेण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.esic.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रकिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

-मुलाखतीची तारीख 15 मे 2024 आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवाराने भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

आवश्यक कागदपत्रे

-वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र.
-शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
-MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे
-नोंदणीचे नूतनीकरण
-जातीचे प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र.
-अनुभव प्रमाणपत्रे.
-आधीच सरकारमध्ये काम करत असल्यास NOC. संस्था/संस्था
-दोन छायाचित्रे (PP आकार)

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts