जॉब्स

Railway Recruitment: 10 वी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट होण्याची सुवर्णसंधी! वाचा भरतीची माहिती

Railway Recruitment:- सध्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक सुवर्णसंधीचा काळ आहे. या कालावधीमध्ये बँक तसेच संरक्षण क्षेत्र व इतर विभागातील भरती प्रक्रिये सोबतच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या विभागांतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.

अगदी याच पद्धतीने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या माध्यमातून देखील आता 598 पदांसाठी भरती केली जाणार असून ही भरती प्रक्रिया एकूण 598 रिक्त पदांसाठी राबवली जाणार आहे. याच भरती प्रक्रियेची माहिती या लेखात बघू.

 रेल्वेमध्ये 598 रिक्त पदांसाठी भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत 598 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून असिस्टंट लोको पायलट या पदासाठी या भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. एकूण 598 रिक्त पदे असून त्याकरता ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे.

 प्रवर्गनिहाय रिक्त पदसंख्या

या भरती प्रक्रिया अंतर्गत 598 पदे भरली जाणार आहेत व यामध्ये ओपन कॅटेगिरी करिता 464, एससी कॅटेगिरी करिता 89 आणि एसटी कॅटेगिरीकरिता 45 जागा रिक्त आहेत.

 शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा

असिस्टंट लोको पायलट या पदासाठी घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेच्या माध्यमातून दहावी पास केलेला असावा व त्यासोबत पदावर पात्र होण्याकरिता उमेदवाराकडे आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

जर आपण याकरिता आवश्यक असलेल्या वयोमर्यादेचा विचार केला तर किमान 18 वर्षे वय असणे गरजेचे आहे. जनरल कॅटेगिरी करिता 18 ते 42 आणि एससी आणि एसटी कॅटेगरीकरिता 18 ते 47 वयोमर्यादा याकरिता निश्चित करण्यात आलेली आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उमेदवार हा नागपूर विभागाचा नियमित कर्मचारी असणे गरजेचे आहे. नागपुरातून दुसऱ्या रेल्वे विभागामध्ये बदली झालेले उमेदवार या पदासाठी पात्र राहणार नाहीत.

 या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

यामध्ये उमेदवारांचे निवड ही संगणक आधारित परीक्षा आणि त्यानंतर संगणक आधारित ॲप्टीट्यूड परीक्षा या आधारे केली जाईल. यामध्ये संगणक आधारित परीक्षेमध्ये दोन भाग आहेत व यातील भाग ए आणि भाग बी असे ते दोन भाग असून यामध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा एकूण कालावधीत दोन तास तीस मिनिटांचा असणार आहे

व यामध्ये एकूण 175 प्रश्न असणार आहे. यातील भाग ए हा 90 मिनिटांचा आणि त्यामध्ये शंभर प्रश्न असणार आहेत. पात्रतेकरिता कमीत कमी उत्तीर्ण होण्यासाठीची टक्केवारी सर्वसाधारण श्रेणीसाठी 40% इतकी आहे. तसेच भाग बी हा 60 मिनिटांचा असणार असून त्यात 75 प्रश्न विचारले जातील व या विभागाकरिता पात्रता टक्केवारी 35 टक्के इतकी आहे.

 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

या भरती प्रक्रिया अंतर्गत ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते सात जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना  https://secr.indianrailway.giv.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल व अधिक ची माहिती देखील या वेबसाईटवर उमेदवारांना घेता येईल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil