Cent Bank Home Finance Ltd Bharti : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. याबाबतची जाहिरात देखील कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत “अधिकारी, वरिष्ठ अधिकारी” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
वरील भरती अंतर्गत 60 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 21 वर्षे ते 35 वर्षे इतके असावे.
अर्ज शुल्क
SC/ST/OBC/EWS उमेदवारांसाठी 200/- रुपये तर GENERA उमेदवारांसाठी 500/- रुपये इतके शुल्क असतील.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेवारांची निवड ऑनलाइन चाचणी/मुलाखती द्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.cbhfl.com/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/cbhfloct23/ या लिंकवरून सादर करायचे आहेत.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायला विसरू नका.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.