Maharashtra State Co-Operative Bank Bharti : जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 असून, उमेदवारांनी ताबड्तोन आपले अर्ज सादर करावेत.
या भरतीसाठी उमेदवार B.E/ B.Tech झालेला असावा. तसेच यासाठी वयोमर्यादा २८ ते ३५ वर्षे इतकी आहे. तसेच यासाठी अर्ज शुल्क देखील अनिवार्य आहे. यासाठी शुल्क 1,770/- रुपये इतके आहे.
या भरती साठी अर्ज पद्धती ऑनलाईन आहे, उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/tmscbljan24/ या लिंकद्वारे अर्ज सादर करावेत. तसेच अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.mscbank.com/
ला भेट द्या.अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-तसेच अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.