जॉब्स

Income Tax Department : आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी; मुंबईत सुरु आहे भरती, वाचा !

Income Tax Department Recruitment : आयकर विभाग अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे, ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील ही नोकरी करू इच्छित असाल तर ताबडतोब आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. लक्षात घ्या ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

आयकर विभाग अंतर्गत सध्या “कर सहाय्यक, हवालदार” पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत कर सहाय्यक, हवालदार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण २९ जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001 या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास incometaxmumbai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts