Pune Bharti 2023 : तुम्हीही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे, जर तुम्ही पुण्यात असाल आणि पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जाते जात आहेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे सुरु असलेल्या या भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जे उमेदवर इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात घ्या मुलाखतीची तारीख 6 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार आवश्यकतेनुसार गरजेची आहे. ही भरती पुणे येथे सुरु असून, उमेदवार मुलाखतीसाठी ‘ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37’ या पत्त्यावर 6 सप्टेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेत हजर राहू शकतो. दरम्यान, तुम्हाला या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट www.esic.nic.in
ला भेट देऊ शकता.निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
-येथे नोकरी करण्यास इच्छुकअसणाऱ्या उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीची तारीख 6 सप्टेंबर 2023 आहे.
-मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहायचे आहे.
-मुलाखतीकरीता येताना सर्व आवश्यक कागपत्रे सोबत आणावीत.
-या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.