जॉब्स

HURL Recruitment 2024: हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड अंतर्गत एकूण 212 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

HURL Recruitment 2024: हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (HURL Bharti) अंतर्गत “पदवीधर इंजिनिअर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 212 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तसेच या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

या भरतीसाठी जे इच्छुक उमेदवार अर्ज करत आहेत त्यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

HURL Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक: HURL/GET-DET/2024/01

पदाचे नाव आणि तपशील:

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत ही भरती “पदवीधर इंजिनिअर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी” या पदांसाठी होत आहे तसेच ही भरती प्रक्रिया एकूण 212 जागांसाठी राबवली जात आहे.

पद क्रमांकपदांचे नावएकूण जागा
01.पदवीधर इंजिनियर ट्रेनी (Graduate Engineer Trainee)67
02.डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी (Diploma Engineer Trainee)145

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर इंजिनियर ट्रेनी: इंजिनिअर पदवी / AMIE
  • डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी: इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा B.Ssc Physics/ Chemistry/Maths)
  • (शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी)

वयोमर्यादा:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करीत आहेत त्यांचे वय दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी,

  • पद क्र.01: 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.02: 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • पद क्र.01: ₹750/-
  • पद क्र.02: ₹500/-

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 (05.00 PM) आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज फक्त खाली दिलेल्या पोर्टल द्वारे स्वीकारले जातील.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे यानंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
  • अधिक माहितीसाठी यांच्या www.hurl.net.in अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://hurl.net.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan

Recent Posts