जॉब्स

Bank Of Maharashtra Bharti : अहमदनगर मधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी हवी असेल तर ताबडतोब पाठवा अर्ज…

Bank Of Maharashtra Bharti : अहमदनगर मधील बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या भरतीसाठी कशा प्रकारे अर्ज करता येईल जाणून घेऊया…

बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर अंतर्गत “रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर येथे पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://bankofmaharashtra.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडणे देखील महत्वाचे आहे, तसेच 20 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts