Top Courses:- आजचे युग हे महागाई आणि बेरोजगारीचे युग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमांना महत्त्व देणे खूप गरजेचे आहे.
कारण नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे एखादा कौशल्य विकासाच्या संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहून दोन पैसे कमवण्याची अक्कल मिळवणे खूप गरजेचे आहे.शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघितले तर बारावीचे वर्ष खूप महत्त्वाचे वर्ष समजले जाते व बारावी पूर्ण गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी एक चांगला करिअरचा पर्याय निवडणे खूप गरजेचे आहे
बारावीनंतर जर तुम्हाला चांगली नोकरी मिळवायचे असेल तर असे काही कोर्स आहेत की ते पूर्ण करून तुम्ही मोठ्या पगाराची नोकरी मिळवू शकतात. त्यामुळे या लेखात आपण असे काही कोर्स बघणार आहोत जे तुम्ही बारावीनंतर करू शकतात व सहजपणे चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतात.
बारावीनंतर करा हे टॉप कोर्स
1- डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स– आजच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मागणी सर्वाधिक वाढतांना दिसून येत आहे. हे तंत्रज्ञान आता प्रत्येक क्षेत्रात वापरले जात आहे. हा अभ्यासक्रम संगणक विज्ञान अंतर्गत येत असला तरी या अभ्यासक्रमात डिप्लोमा देणाऱ्या अनेक ऑफलाइन आणि ऑनलाईन संस्था आहेत.
या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक समस्या सोडवणारे तंत्रज्ञान कसे तयार करायचे हे शिकवले जाते. यामध्ये चॅट जीपीटी, अलेक्सा आणि siri इत्यादी तंत्रज्ञान शिकवले जाते. भविष्यामध्ये चांगली आणि जास्त पगाराची नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही या कोर्समध्ये डिप्लोमा करू शकता.
2- डिप्लोमा इन क्लाऊड कम्प्युटिंग– क्लाऊड कम्प्युटिंग कोर्सबद्दल अनेक जणांना अजून माहिती नाही. भारतात फारशी महाविद्यालय किंवा संस्था हा अभ्यासक्रम अजून पर्यंत शिकवत नाहीत.
परंतु ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हा कोर्स सध्या आरामात पूर्ण करू शकता. तसे पाहायला गेले तर संगणक तंत्रज्ञानामध्ये क्लाऊड कम्प्युटिंगची महत्त्वाची भूमिका आहे. क्लाऊड कम्प्युटिंग एक नेटवर्क आहे व त्यामुळे तुमच्या डेटावर जलद प्रक्रिया करणे सोपे होते.
क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला डेटा ही सुरक्षित केला जातो. त्यामुळे आजच्या काळात या क्षेत्रातील तज्ञांना खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे तुम्ही जर या कोर्समध्ये डिप्लोमा केला आणि तुमचे कौशल्य इम्प्रू केले तर तुम्हाला वर्षाला 15 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज अगदी सहजपणे मिळू शकते.
3- ॲनिमेशन आणि डिझाईन– तुमच्याकडे जर सर्जनशीलता असेल तर ॲनिमेशन डिझाईनिंग करिअर हा तुमच्यासाठी खूप उत्तम पर्याय ठरू शकतो. या माध्यमातून तुम्हाला नवीन आणि मनोरंजक कल्पना सादर करण्यास वाव मिळतो.
व्यक्तीला ॲनिमेशन डिझायनिंग करिता कम्प्युटर आणि विविध ॲनिमेशन सॉफ्टवेअरचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच सर्जनशील विचार देखील असावा. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही चांगले ॲनिमेटर बनुन बॉलीवूड पासून हॉलिवूड चित्रपट, टेलिव्हिजन शो तसेच व्हिडिओ गेम किंवा जाहिरात उद्योगापर्यंत प्रत्येक गोष्टीत उत्तम काम करू शकता व चांगल्या प्रकारे पैसा मिळवू शकतात.