Indian Air Force Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता, ज्या तरुणांना देशसेवेची इच्छा असेल आणि भारतीय वायुदलात सामील व्हायचे असेल अशा तरुणांसाठी ही एक गुड न्यूज राहणार आहे.
कारण की भारतीय वायुदलाने म्हणजेच इंडियन एअर फोर्स ने काही रिक्त जागांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना निर्गर्मित केली आहे. एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट अंतर्गत रिक्त पदांची ही भरती होणार आहे. यासाठी अद्याप अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही.
मात्र एक जून 2023 रोजी अर्थातच आणखी पाच दिवसात यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावे असलेल्या संपत्तीवर, मालमत्तेवर लोन घेता येते का? काय सांगतो नियम, वाचा….
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती
कमिशंड ऑफिसरच्या AFCAT एंट्री – फ्लाइंग, AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (टेक्निकल), AFCAT एंट्री – (नॉन टेक्निकल), NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग या जागांसाठी ही भरती राहणार आहे.
किती पदांसाठी होणार भरती
या पदाच्या 276 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रते संदर्भात सर्व माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचावी लागणार आहे.
https://drive.google.com/file/d/1FSQrlOQMvHKetAbopSMvZssFsoSPu-yd/view या लिंक वर जाऊन आपण अधिसूचना पाहू शकता.हे पण वाचा :- खरं काय ! ‘हा’ 2 रुपयाचा स्टॉक 3 वर्षातच बनला 714 रुपयाचा, गुंतवणूकदारांना तीन वर्षातच मिळाला 25,407% परतावा, वाचा….
अर्ज कसा करावा लागणार?
https://afcat.cdac.in/AFCAT/ या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. अर्ज भरण्यास एक जून 2023 पासून सुरुवात होणार आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?
एक जून ते 30 जून या एका महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवाराला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन सादर करता येणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग : महामार्गालगत ‘या’ चार ठिकाणी तयार होणार हेलिपॅड, अपघात झाल्यास होणार मोठा फायदा