Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर (Short Service Commissioned Officer) पदांसाठी (Post) अर्ज (application) आमंत्रित केले आहेत. ज्या अंतर्गत भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर उमेदवारांकडून (candidates) ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 21ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. तर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत संधी देण्यात आली आहे.
यामध्ये एकूण 212 पदांची भरती करण्यात आली आहे. ज्यामध्ये जनरल सेवेची 56, हवाई वाहतूक नियंत्रकाची 5, नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसरची 15, पायलटची 25, लॉजिस्टिकची 20, शिक्षणाची 12, इंजिनीअरिंगची 25, इलेक्ट्रिकलची 45 आणि नेव्हल कन्स्ट्रक्टरची 14 पदे आहेत.
पात्रता निकष
पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पात्रता निकष आणि भरतीशी संबंधित इतर माहिती तपासू शकतात.
निवड प्रक्रिया
शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. मिळालेले गुण आधी नॉर्मल केले जातील. ज्याच्या आधारावर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीची माहिती उमेदवारांना मेल किंवा एसएमएसद्वारे पाठवली जाईल.