IIP Mumbai Bharti 2024 : भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज कशा प्रकारे सादर करायचे ते पुढीलप्रमाणे :-
वरील भरती अंतर्गत “दिग्दर्शक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असेल पुढे सांगण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
पॅकेजिंग आणि संबंधित क्षेत्रातील किमान 15 वर्षांच्या अनुभवासह पॅकेजिंगशी संबंधित विषयात पीएचडी अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/पॅकेजिंग क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी खालील नोंदीनुसार किंवा किमान २० सह समतुल्य वर्षांचा अनुभव असावा असावा.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज शुल्क
वरील भरतीसाठी अर्ज शुल्क 1000/- रुपये इतके आहे.
अर्ज पद्धती
वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, अर्ज https://www.iip-in.com/iip-careers/current-openings.aspx या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://iip-in.com/ या वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज 03 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.