Indian Railways Jobs : अनेक तरुण तरुणी सरकारी नोकरी करण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा देत असतात. तसेच सरकारी नोकरीसाठी अनेक वर्षे धडपड करून देखील काही वेळा सरकारी विभागात नोकरी लागत नाही. मात्र आत तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
तुम्हालाही सरकारी विभागात नोकरी करायची असेल तर तुम्ही रेल्वे विभागात निघालेल्या जागांसाठी अर्ज करून तुमचे सरकारी नोकरदार होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागासाठी लाखो जागा काढल्या आहेत.
भारतीय रेल्वे विभागाकडून 2.4 लाखांहून अधिक रिक्त जागा सोडण्याची तयारी करण्यात येत आहे. या रिक्त जागांमध्ये सुरक्षा कर्मचारी, असिस्टंट स्टेशन मास्टर (ASM), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) आणि तिकीट कलेक्टर (TC) अशा जागा काढल्या जाणार आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या विभागातील रिक्त जागांबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, रेल्वेच्या गट क पदांवर २,४८,८९५ पदे रिक्त आहेत, ब पदांमध्ये २०७० पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेवरील गट ‘अ’ सेवांमध्ये थेट भरती प्रामुख्याने UPSC द्वारे केली जाते. आता यूपीएससी आणि डीओपीटीवर मागणी करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे विभागाकडून अलीकडेच 9739 कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर, 27019 असिस्टंट लोको पायलट (ALP) आणि टेक्निशियन ग्रेड पोस्ट, 62907 ग्रुप डी पोस्ट, 9500 RPF भरती रिक्त जागा आणि RPF मध्ये 798 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
जाणून घ्या- कोणत्या गटासाठी कोणती पात्रता असणार आहे
गट अ
गट अ यासाठी रेल्वे विभागाकडून UPSC द्वारे नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा आयोजित करून केली जाते याद्वारे उमेदवारांची निवड केली जाते.
गट ब
ब गटातीळ रिक्त पदे भरण्यासाठी रेल्वे विभागाकडून विभाग अधिकारी श्रेणी-सुधारित पदे गट ‘सी’ रेल्वे कर्मचार्यांकडून प्रतिनियुक्तीच्या आधारावर जोडली जातात.
गट क
क गटातील भरती स्टेशन मास्टर, तिकीट कलेक्टर, लिपिक, कमर्शियल अप्रेंटिस, सुरक्षा कर्मचारी, वाहतूक शिकाऊ, अभियांत्रिकी पदे (इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि टेलिकॉम, सिव्हिल, मेकॅनिकल) या पदांसाठी केली जाते.
गट ड
ड गटातील भरती ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टंट पॉइंट्स मॅन, सफाईवाला/सफाईवाली, गनमन, शिपाई यासाठी केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकता.
अर्ज कसा करावा
तुम्हालाही रेल्वे विभागात निघणाऱ्या जागांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही Indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
यानंतर तुम्ही RRB क्षेत्र किंवा RRC किंवा मेट्रो रेल्वे ज्यासाठी अर्ज करत आहेत ते क्षेत्र निवडा.
भरती विभागावर क्लिक करून सर्व सूचना वाचा.
त्यांनतर अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा आणि सबमिट करा.
यानंतर अर्जासाठी असणारी फी भरा आणि सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.