Bank of India Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची आहे. सध्या मुंबईतील बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “अधिकारी” पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
पदवीधर उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
या पदासाठी वयोमर्यादा 25 वर्षे ते 40 वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्क
SC/ST उमेदवारांसाठी 175/- रुपये तर सामान्य उमेदवारांसाठी 850/- रुपये इतके शुल्क आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर https://bankofindia.co.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://bankofindia.co.in/career लिंकद्वारे सादर करायच्या आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करावे. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगदोर आपले अर्ज सादर करा.
-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.