ISRO Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी आनंदाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. विशेषता ज्या तरुणांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थातच इस्रो मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची पर्वनीच आहे.
कारण की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने विविध रिक्त पदांच्या पदभरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना निर्गमित केली आहे. इस्रो ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीची घोषणा केली आहे.
यानुसार इस्रो मध्ये इंजिनियर आणि सायंटिस्ट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत आज आपण इस्रोने कोणत्या आणि किती रिक्त जागांसाठी भरती काढली आहे, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची अंतिम दिनांक यांसारख्या सर्व बाबी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल, कुठ पाहणार रिजल्ट?
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती?
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपल्या अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, साइंटिस्ट/इंजिनीअर ‘एससी’ (इलेक्ट्रॉनिक्स) – 90 साइंटिस्ट/इंजिनीअर ‘एससी'(मॅकेनिकल) -163 साइंटिस्ट/इंजिनीअर ‘एससी’ (कॉम्प्युटर सायन्स) – 47 साइंटिस्ट/इंजिनीअर ‘एससी'(इलेक्ट्रॉनिक्स) – ऑटोनॉमस बॉडी – PRL- 02 साइंटिस्ट/इंजिनीअर ‘एससी'(कॉम्प्युटर सायन्स) – ऑटोनॉमस बॉडी – PRL – 01 अशा एकूण 303 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रते संदर्भात सविस्तर अशी माहिती इस्रो ने आपल्या अधिकृत अधिसूचनेत दिली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम इस्रोने काढलेली जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
किती पगार मिळणार?
वर नमूद केलेल्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे घरभाडे भत्ता, महागाई भत्ता इत्यादी लाभ देखील निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार अनुज्ञय राहणार आहेत.
अर्ज कसा करावा लागणार
यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. https://www.isro.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक उमेदवार आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करू शकतात.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?
इच्छुक उमेदवारांना 14 जून 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे तसेच 16 जून 2023 पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. विहित कालावधीमध्ये सादर झालेल्या अर्जावरच मात्र विचार होईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला, प्रवाशांच्या मागणीला यश