जॉब्स

Job News: 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! वाचा या भरती विषयी संपूर्ण माहिती

Job News:- सध्या विविध परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आणि काही केंद्र सरकारच्या माध्यमातून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे तरुणांनी अशा भरतीचा लाभ घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये विविध बँक असो किंवा जिल्हा परिषद अंतर्गत देखील भरती प्रक्रिया आता महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे आता भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून रेल्वेमध्ये नोकरी करायचे असेल किंवा रेल्वे भरतीची तयारी करत आहेत अशा तरुणांसाठी एक आनंदाचे अपडेट सध्या समोर आले आहे.

 दहावी पास असलेल्यांना भारतीय रेल्वेत नोकरीचे सुवर्णसंधी

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून रेल्वेने 1646 पदांकरिता भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून आज पासून म्हणजेच 10 जानेवारी 2024 पासून यासाठीची महत्त्वपूर्ण अशी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते यासाठी अर्ज करू शकतात. संबंधित भरती प्रक्रिया ही उत्तर पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून ती शिकावू पदांसाठी राबवली जाणार आहे. उमेदवारांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसारच अर्ज यामध्ये सादर करावा व नियमानुसार सादर केलेले अर्ज ग्राह्य असणार आहे.

 या भरतीसाठी आवश्यक पात्रता

त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचा असेल ते उमेदवार 50 टक्के गुणांसह दहावी पास असणे बंधनकारक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे.

 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी पात्र असलेल्या इच्छुक अर्जदाराचे वय हे 18 ते 24 वर्ष दरम्यान असावे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये  सूट देण्यात आलेली आहे.

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार विचार केला तर अर्ज केलेले सर्व उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार आहे. म्हणजेच दहावी आणि आयटीआय मध्ये मिळालेले एकूण गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल व निवडलेल्या उमेदवारांना रेल्वेने

विहित केलेले स्टायपेंड देखील मिळणार आहे. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन करण्यात येईल व महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट वेरिफिकेशन शिवाय कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती केली जाणार नाही.

 अर्ज कसा कराल?

याकरिता rrcjapur.in या संकेतस्थळावर जावे व त्या ठिकाणी रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जाऊन अप्रेंटिस रिक्रुटमेंट नोटिफिकेशन वर क्लिक करावे. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे वाचावीत व त्या पद्धतीने अर्ज करावा. त्यानंतर फी भरावी व अर्ज सबमिट करावा.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts