Job Update :- सध्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्याकरिता नोटिफिकेशन देखील जारी करण्यात येत आहेत. तसेच वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.त्यामुळे बऱ्याच दिवसापासून थांबलेल्या भरती प्रक्रियांना वेग आल्यामुळे आता वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना दिलासा मिळताना दिसून येत आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सध्या तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे व वनरक्षक भरतीची परीक्षा गेल्या काही दिवसापूर्वी संपलेली आहे. तसेच विविध जिल्हा परिषद अंतर्गत देखील ग्रामसेवक तसेच आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जर आपण ओएनजीसी अर्थात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचा विचार केला तर यामध्ये देखील मोठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचा असेल ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
रिक्त पदाचे नाव आणि एकुण रिक्त जागा
ओएनजीसी मार्फत जवळजवळ 2500 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून ही भरती प्रक्रिया ट्रेड पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस या रिक्त पदा करिता राबवण्यात येणार आहे.
विभागानुसार रिक्त पदांची संख्या
यामध्ये उत्तर विभागात 159, मुंबई भागात 436, पश्चिम विभागात 732, पूर्व विभागात 593, दक्षिण विभागात 378 आणि मध्य विभागात 202 अशाप्रकारे विभागीनिहाय रिक्त जागा आहेत.
या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता
1- ट्रेड अप्रेंटिस– या रिक्त पदांकरिता दहावी उत्तीर्ण / बारावी उत्तीर्ण/ आयटीआय( स्टेनोग्राफी – इंग्रजी/ सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ ड्राफ्ट्समन/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ICTSM/ लॅब असिस्टंट/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/ मशीनीस्ट/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ मेकॅनिक डिझेल/ रेफ्रिजरेटर अँड एसी मेकॅनिक / प्लंबर/ सर्वेअर आणि वेल्डर
2- टेक्निशियन अप्रेंटिस– सिविल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीकरिता अर्ज करायचा असेल त्या उमेदवारांचे वय 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे. तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता पाच वर्षे वयात सूट देण्यात आली असून इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.
पदनिहाय मिळणारा पगार
त्यामध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदाकरिता नऊ हजार, ट्रेड अप्रेंटिस या पदाकरिता 8000 आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदाकरिता 9000 रुपये इतका पगार असणार आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचा असेल ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
ongcapprentice.ongc.co.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.