MPSC Recruitment: विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या अनेक प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असून यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया तसेच एमपीएससी मार्फत देखील अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा विचार केला तर या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 करिता एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. या भरती प्रक्रियेचे अर्ज प्रक्रिया, अर्ज करण्याची तारीख आणि शेवटची तारीख व रिक्त पदे व इतर महत्त्वाची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक होण्याची सुवर्णसंधी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली असून याकरिता जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 615 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्रता
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या परीक्षेकरिता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील जे सध्या कार्यरत आहेत असे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार तसेच पोलीस नाईक व पोलीस शिपाई पात्र राहणार आहेत.
लागणारी शैक्षणिक पात्रता
याकरिता कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असून चार वर्षे नियमित सेवा किंवा बारावी उत्तीर्ण आणि पाच वर्षे नियमित सेवा किंवा दहावी उत्तीर्ण व सहा वर्षे नियमित सेवा अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असणार आहे.
या परीक्षा करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा
या परीक्षेकरिता इच्छुक असलेल्या ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांचे वय हे तीन ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे.
परीक्षेकरिता लागणारे
शुल्कया परीक्षाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा फी भरावी लागणार असून त्याकरिता खुला वर्गातील उमेदवारांना 544 मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांकरिता 344 रुपये इतके असणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?
परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन श्रेणी ही अडतीस हजार सहाशे ते एक लाख 22 हजार 800 इथपर्यंत असणार आहे.
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करता अर्ज करायचे आहे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख
या इच्छुक उमेदवारांना या भरतीकरिता अर्ज करायचे आहेत ते तीन ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
पूर्व परीक्षा कधी होणार?
एमपीएससी मार्फत राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिया करिता पूर्वपरीक्षा ही दोन डिसेंबर 2023 या तारखेला होणार आहे.
परीक्षा केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत?
या भरती करिता परीक्षा केंद्र हे छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नागपूर तसेच पुणे, नांदेड, अमरावती आणि नाशिक या ठिकाणी असणार आहे.
या भरतीचे अधिकृत संकेतस्थळ
www.mpsc.gov.in यावर अधिकची माहिती घेऊ शकतात.