जॉब्स

Jobs : Tata देणार ‘या’ पदवीधर उमेदवारांना नोकरी, जाणून घ्या अटी व नियम

नवी दिल्ली : गेल्या एक दोन वर्षांपासून तरुणांमध्ये नोकरी (Job) हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण कोरोनाच्या (Corona) काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून सध्या अनेक कंपन्या (Companies) नवीन नोकऱ्या काढत आहे, ज्याचा फायदा आपण घेतला पाहिजे.

सध्या जॉब मिळणं थोडं कठीण आहे. मात्र, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services) काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) फ्रेशर्ससाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. टीसीएस अॅटलास हायरिंगच्या माध्यमातून (TCS Atlas Hiring) एक ऑफ-कॅम्पस हायरिंग प्रोग्राम राबवला जाणार आहे.

याविषयीचं सविस्तर वृत्त ‘द बेटर इंडिया’ने प्रकाशित केले आहे. टीसीएसच्या या भारती प्रक्रियेत गणित (Mathematics), सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र (Statistics or Economics) या विषयात M.Sc पदवी किंवा अर्थशास्त्रात (Economics) MA पदवी घेतलेल्या फ्रेश उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.

‘TCS Atlas Hiring’ द्वारे निवडण्यात येणारे उमेदवार उत्कृष्ट व्यावसायिक परिणाम मिळवून देण्यास, आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यास आणि व्यवसायाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात योगदान देतील”, असे टीसीएसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पात्रता

– भरतीसाठी आवश्यक पात्रता या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार २०२०, २०२१ किंवा २०२२ या वर्षांत पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

– किमान वय १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

– उमेदवारांनी इयत्ता १०वी, १२ वी, डिप्लोमा (लागू असल्यास), पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा किमान ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

– नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे (NIOS) 10वी आणि 12वी पूर्ण केलेले उमेदवारदेखील या पदांसाठी पात्र आहेत.

– २०२० आणि २०२१ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या निकालात कोणताही बॅकलॉग नसावा.

अटी

– उमेदवाराकडे अभ्यासक्रम पूर्ण केल्याची कागदपत्रं उपलब्ध असावीत.

– २०२२ साली उत्तीर्ण झाल्यानंतर एका वर्षाच्या आत उमेदवारांसाठी फक्त एका बॅकलॉगची मुभा आहे. मात्र प्रलंबित बॅकलॉग निर्धारित अभ्यासक्रमाच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.

– उमेदवाराने शिक्षण किंवा कामातून ब्रेक घेतला असल्यास तो ब्रेक २४ महिन्यांपेक्षा जास्त नसावा.

– तसेच केवळ वैध कारणांसाठीच घेतलेल्या ब्रेक गृहित धरला जाईल.

– उमेवारांची सर्व संबंधित कागदपत्रं (Document Proof ), योग्य असल्यास गॅप सर्टिफिकेट (Gap Certificate) तपासलं जाईल.

– शैक्षणिक किंवा कामाच्या अनुभवादरम्यान गॅप, थकबाकी किंवा बॅकलॉग असेल तर सर्व उमेदवारांनी ते जाहीर करणं आवश्यक आहे.

– ज्या उमेदवारांना कामाचा २ वर्षांचा अनुभव आहे, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

असा करा अर्ज

उमेदवारांनी सर्वप्रथम TCS NextStep पोर्टलवर जाऊन नोंदणी करून अर्ज भरावा. अर्जाची स्थिती ‘Application Received’ and above अशी असावी. अर्ज भरताना उमेदवाराने सीटी/डीटी आयडी (CT/DT ID) सोबत ठेवावं. उमेदवारांकडे आधीच CT/DT आयडी असेल तर त्यांनी TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावे आणि अर्ज भरावा.

उमेदवार नवीन यूजर असल्यास TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करावे आणि ‘Register Now’ या पर्यावर क्लिक करावे. त्यानंतर ‘IT’ ही श्रेणी निवडावी आणि पुढे जाऊन उमेदवाराचा सर्व तपशील भरावा.

सर्व तपशील व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. एकाच उमेदवाराच्या अनेक नोंदी आढळल्यास ते अपात्र ठरतील. अधिक तपशीलासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना TCS Atlas Hiring : Registrations Open for Campus Recruitment वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts