KVK Baramati Bharti 2024 : कृषी विज्ञान केंद्र, बारामती जि. पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.
कृषी विज्ञान केंद्र, बारामती जि. पुणे अंतर्गत “कुशल सहाय्यक कर्मचारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 असून, अर्ज देय तारखे अगदोर सादर करायचे आहेत. लक्षात घ्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
या भरती साठी अर्ज करणारा उमेदवार मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण असावा, येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदानगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – ४१३११५, महाराष्ट्र या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.kvkbaramati.com/
ला भेट देऊ शकता.अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-पोस्टाने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.