Maha IT Corporation Ltd Bharti : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु आहे, तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे. भरती संबंधित आणखी माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत “लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी, लेखा कार्यकारी, असिस्टंट टॅक्स मॅनेजर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहू शकतात. मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच “असिस्टंट टॅक्स मॅनेजर” या पदाकरिता ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरतीसाठी उमेदवार पदवीधर असला पाहिजे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासावी, ही भरती मुंबईतील जागेसाठी होत असून, उमेदवारांनी, असिस्टंट टॅक्स मॅनेजर पदासाठी ऑनलाईन (ई-मेल) अर्ज rupali.gaikwad@mahait.org या मेलद्वारे पाठवायचे आहेत, तसेच ऑफलाईन अर्ज महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई 400020. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
वरील भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार असून, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई 400020. येथे 16 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mahait.org/
ला भेट द्या.असा करा अर्ज
-असिस्टंट टॅक्स मॅनेजर या पदाकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचा आहे.
-लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
निवड प्रकिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
-वरील पदांकरीता मुलाखत 16 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.