Pune Recruitment 2023 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. पुण्यात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, ते येथे अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येथे सुरु असलेली भरती “कार्यालय प्रशासक, कार्यालय अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक” पदांसाठी होत आहे. या भरती अंतर्गत एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी येथे अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा…
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
ही भरती कार्यालय प्रशासक, कार्यालय अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी होत असून, इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करावेत, लक्षात घ्या येथे फक्त 06 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे, सातारा, नवी मुंबई येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
पदांनुसार वयोमर्यादा वेगवगेळी असेल, कार्यालय प्रशासक 35 ते 45 वर्षे, कार्यालय अधीक्षक 35 ते 40 वर्षे, कनिष्ठ लिपिक 26 ते 40 वर्षे, प्रयोगशाळा सहाय्यक 26 ते 40 वर्षे अशी आहे.
अर्ज पद्धती
वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या मेलद्वारे अर्ज पाठवावेत.
ई-मेल पत्ता
इच्छुक उमेदवार jobs@mespune.in या मेलद्वारे अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची 19 ऑगस्ट 2023 आहे. तरी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी mespune.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज jobs@mespune.in या मेल वर पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज करण्यापूर्वी भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2023 आहे. देय तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
-उमेदवारांच्या अर्जाच्या आधारे त्यांना मुलाखतीस बोलावले जाईल.
-पात्र उमेदवारांपैकी फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
-मुलाखतीची माहिती आणि त्याचे ठिकाण मोबाईलवर एसएमएस आणि ईमेलद्वारे पाठवले जाईल.
-मुलाखतीस जाताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.