Maharashtra State Co-operative Bank : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 35 ते 59 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
उमेदवारांनी अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर, एचआरडी अँड एम विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001 या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 27 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mscbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
-अर्ज वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.