जॉब्स

Mahatransco Pimpari Bharti 2024: महापारेषण अंतर्गत विविध पदांवर दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; काय आहे पात्रता जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mahatransco Pimpari Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) पिंपरी चिंचवड अंतर्गत “अप्रेंटिस (Electrician)” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

महापारेषण अंतर्गत एकूण 23 पदांची निवड केली जाणार आहे तसेच भरती संदर्भात अधिकृत संकेतस्थळावरती नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे. तसेच या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्वांची माहिती सविस्तरपणे खाली समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF आणि अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे.

Mahatransco Pimpari Bharti 2024 Details

पदाचे नाव:

  • महापारेषण अंतर्गत ही भरती अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पदसंख्या:

  • महापारेषण विभाग अंतर्गत ही भरती अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) या पदांसाठी एकूण 023 जागांसाठी होत आहे.

नोकरीचे ठिकाण:

  • पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

निवड प्रक्रिया:

  • या भरती अंतर्गत अंतिम उमेदवाराची परीक्षा / मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाइन ऑफलाइन

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

आवश्यक कागदपत्रे:

  • एस.एस.सी मार्कशीट / प्रमाणपत्र
  • आयटीआय मार्कशीट
  • जात प्रमाणपत्र / जात वैध प्रमाणपत्र (असल्यास)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला

कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या शिकाऊ उमेदवारांनी वरील मूळ कागदपत्रे आणि एक झेरॉक्स संच दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी येताना खालील पत्त्यावर सोबत आणावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

कार्यालयीन पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महापारेषण कार्यालय, एडी.सं.व.सु. विभाग पिंपरी चिंचवड, सब स्टेशन जवळ, बिलजी नगर, चिंचवड पुणे 411033

वयोमर्यादा:

या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी अर्ज 05 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी सादर करावा.

महत्त्वाच्या तारखा:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahatransco.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan

Recent Posts