Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : पुणे शहारत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा फायदा घ्यावा.
या भरती अंतर्गत सुरक्षारक्षक, कॉल ऑपरेटर, पर्यवेक्षक इतर पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. महिला व बालविकास विभाग येथील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तरी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच यासाठी अर्ज सादर करावेत.
भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदांची नावे आणि रिक्त जागा
या भरती अंतर्गत सुरक्षारक्षक, हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय शिपाई व इतर पदे भरली जाणार असून, या भरती अंतर्गत एकूण 26 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या पात्रतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
मासिक वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,000 ते 48,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज शुल्क
प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क 350/- रुपये इतके आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे.
व्यावसायिक पात्रता
लक्षात घ्या प्रत्येक पदासाठी अनुभव आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक
वरील पदांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
ऑनलाईन अर्जाची लिंक
या भरतीसाठी उमेदवार https://missionshaktihelpline.com/ या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतात.