MPSC 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत (Maharashtra Public Service Commission) सन 2023 मध्ये विविध महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा अंदाजे तारीख (date) पत्रक आणि स्थितीसह घेण्यात आल्या आहेत.
यात महाराष्ट्र (Maharashatra) अराजपत्रित सेवा एकत्रित परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. रिकाम्या लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र (admit card) आणि स्टेटस डाउनलोड करा.
टीप:-
(१) शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल; यागृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहितवेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.
(२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
(३) अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates)वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
(४) संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.
(५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.
वेळापत्रक डाउनलोड करा – https://bit.ly/3rbJyQf
MPSC Exam Date 2022 – Check MPSC Exam Calendar
वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड – https://bit.ly/3ypmYqI
विभागाचे नाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षांचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, व अन्य स्पर्धा परीक्षा
मुख्य परीक्षेच्या तारखा पुढील आठवड्यात, 2022 चं वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार , MPSC Timetable 2022
आताच प्राप्त अपडेट नुसार MPSC ची नवीन तारीख जाहीर झाली आहे – MPSC 2022 Exam Schedule & Timetable – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती.
कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.
अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती – https://bit.ly/3Lp7He1
मुख्य परीक्षेची विद्यार्थ्यांना उत्सुकता
कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळं परीक्षा 6 वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुण्यात चक्काजाम आंदोलन केल्यावर एमपीएसीनं 21 मार्चला परीक्षा झाली होती.
200 पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.
राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते.
या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं.
त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून 21 मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.