जॉब्स

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती ! वाचा सविस्तर माहिती…

MPSC Recruitment 2022 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ आहे. या जागांबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

Maharashtra Public Service Commission तर्फे ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. 

MPSC Recruitment Details 

  1. वैद्यकीय अधिकारी, गट अ/ Medical officer Group A एकूण जागा – ०४
  2. 2) उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, गट अ/ Deputy Health Officer Group A एकूण जागा – ०२

Eligibility Criteria For MPSC Recruitment
पद क्रमांक 1 वैद्यकीय अधिकारी, गट अ

०१) वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्र या विषयातील पदावी (M.B.B.S.) आणि ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची डी.ओ.एम.सी. ही पदव्युत्तर पदविका (DOMS) ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (नेत्ररोग) ही पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य (M.S. – Opth.) ०४) उपरोक्त नमूद केलेली अर्हता धारण केल्यानंतर सर्वसाधारण रुग्णालयामध्ये नेत्र विभागातील कामाचा २ वर्षाचा अनुभव. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची मेडीसीन (M.D.-Medicine) / चर्मरोगामधील पदव्युत्तर पदवी (M.D.-Skin)/प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (M.D.-PSM) किंवा चर्मरोगामधील पदव्युत्तर पदविका (DVD) / प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध शास्त्रातील पदव्युत्तर पदविका (PSM-DPH)

पद क्रमांक 1 वैद्यकीय अधिकारी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, गट अ

०१) वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रातील पदावी किंवा भारतीय वैद्यक परिषद अधिनियम १९५६ च्या अनुसूची १ किंवा २ मध्ये नमूद केलेली इतर कोणतीही अर्हता आणि ०२) प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची / संस्थेची सार्वजनिक आरोग्य यामधील पदाव्युत्तर पदविका ०३) शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामधील बृहन्मुंबई मानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी या समतुल्य पदावरील ५ वर्षापेक्षा कमी नाही इतका आरोग्य प्रशासनामधील जबाबदारीच्या पदावरील अनुभव आवश्यक आहे.

वयाची अट : ०१ मे २०२२ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण :  महाराष्ट्र

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts