SAMEER Mumbai Bharti 2024 : सध्या मुंबई सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च अंतर्गत विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत.
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई अंतर्गत “प्रोग्रामर” पदाच्या 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 असून, देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे बी.ई. किंवा B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी) एम.एस्सी (भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स) मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, असे शिक्षण आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवार https://internship.aicte-india.org/ernet.php या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतात, तर अर्ज 21 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://sameer.gov.in/
ला भेट द्या.असा करा अर्ज
-या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-अर्ज 21 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
आवश्यक कागदपत्रे
-10वी/12वीची मार्कशीट
-सर्व वर्षांसाठी पात्रता परीक्षा गुणपत्रिका
-पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)
-आधार कार्ड