जॉब्स

Municipal Co-Operative Bank : मुंबईतील ‘या’ बँकेत पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी, येथे करा अर्ज !

Municipal Co-Operative Bank : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे, येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहे.

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत “सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, टंकलेखक, लिपिक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा सादर करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

वरील पदांसाठी अर्जदार पदवीधर असला पाहिजे, तरी अर्ज करण्यापूर्वी एकदा शैक्षणिक पात्रता तपासावी आणि पदांनुसार अर्ज करावेत. या भरतीसाठी
वयोमर्यादा 18 ते 55 वर्षे इतकी असून, यापुढील उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत.

या पदांकरिता परीक्षा शुल्क देखील अनिवार्य आहे, मागासवर्गीय उमेदवारांकरीता ५००/- रुपये तर खुल्या व ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील उमेदवारांकरीता १०००/- रुपये इतके शुल्क आहे.

या भरती साठी ऑनलाईन अर्ज https://www.mcb.surbanksassociation.in/ या लिंकद्वारे सादर करायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही. भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाईट https://www.municipalbankmumbai.com/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
-देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts