Vani Merchant Bank Bharti : वाणी मर्चंट बँक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, ई.डी.पी. बी. ई. अधिकारी, लिपीक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणिऑनलाईन(ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज 12 मे पर्यंत सादर करायचा आहे तरी, देय तारखे अगोदर अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज दि वणी मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., वणी परीस, शिवाजी रोड, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज vmc_bank@rediffmail.com / vmc_bank@vmcbank.co.in या ईमेलवर सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज 12 मे पर्यंत सादर करायचे आहेत.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिल्याप्रमाणे सादर करावे.
-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे आहे. तरी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.