जॉब्स

New India Assurance Bharti : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 300 पदांवर मोठी भरती; दरमहा 37 हजारापर्यंत मिळेल पगार !

New India Assurance Bharti : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत बंपर भरती सुरु आहे. या भरती साठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहे.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष. उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे, या पुढील उमेदवारांनी अर्ज करू नये. वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 37,000/- पर्यंत पगार मिळेल.

ऑनलाईन अर्ज https://www.newindia.co.in/portal/ या लिंकद्वारे सादर करायचे असून, देय तारखे पूर्वी आपले अर्ज सादर करावेत, भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.newindia.co.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल.
-तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts