जॉब्स

NHM Nashik Bharti 2023 : NHM नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !

NHM Nashik Bharti 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तरी उमेदवारांनी या संधीचा फायदा घेऊन नोकरीसाठी अर्ज सादर करावेत.

ही भरती “ट्यूटर, फॅकल्टी सदस्य – महिला”, एपिडेमियोलॉजिस्ट” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी होत असून, यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे. भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा…

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

ही भरती ट्यूटर, फॅकल्टी सदस्य – महिला, एपिडेमियोलॉजिस्ट पदांसाठी होत असून, येथे 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीकरिता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासा.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे होत असून, येथील बेरोजगार उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.

वयोमर्यादा 

वयोमर्यादा 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी 150/-रुपये तर राखीव प्रवर्गासाठी – 100/- रुपये इतके शुल्क आहे.

अर्ज पद्धती

ही भरती ऑफलाईन पद्धतीने होत असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर शालिमार, नाशिक -४२२००१ येथे पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवार zpnashik.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे ती मिळवू शकतो.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत.
-वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज अपूर्ण असल्यास तो नाकारला जाईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची जोडणे महत्वाचे आहे.
-येथे अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

आवश्यक कागदपत्रे

-वयाचा पुरावा
-पदवी / पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र
-गुणपत्रिका
-कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable )
-शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts