जॉब्स

10 वी,12 वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात शेतीसंबंधी ‘हा’ महत्त्वाचा व्यवसाय! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

भारतामध्ये बेरोजगारीच्या समस्याने खूप मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूप धारण केले असून बेरोजगार किंवा सुशिक्षित तरुणांच्या तुलनेमध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्या खूप अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. परंतु नोकऱ्या न मिळाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट  मोठ्या प्रमाणावर कोसळते.

या पार्श्वभूमीवर तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा तरुणांना अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याचा सरकार प्रयत्न करत असून या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा व त्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे.

अनेक योजना या शेतीसंबंधीत असून शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग तसेच कृषी क्षेत्रातील विविध घटकांच्या पूर्तते करिता देखील अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारने खत आणि बियाणे उद्योगाच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारने नुकतेच खत आणि बियाणे उद्योगाला चालना मिळावी याकरिता त्यासंबंधी असलेल्या नियमांमध्ये काही बदल केले असून या नियमांमधून रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे. या नियमांमध्ये बदल केल्यामुळे आता दहावी पास तरुण देखील खत बियाण्याचा व्यवसाय करू शकणार आहेत.

याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पंधरा दिवसांचा एक अभ्यासक्रम करण्यात आला असून तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तरुणांना बियाणे व खत विक्रीचे दुकान उभारता येणार आहे. आतापर्यंत या व्यवसायामध्ये कृषी पदवीधर असलेल्या तरुणांना मोठी संधी होती.

परंतु केंद्र सरकारने आता दहावी व बारावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना देखील या व्यवसायात उतरण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सरकारच्या माध्यमातून खते व बियाणे क्षेत्रात अनेक सुविधा तरुणांना दिले असून ते आता तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतात.

 या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न

मिळवण्याची मोठी संधी

सरकारच्या माध्यमातून आता खत आणि बियाणे व्यवसायासाठी जो काही आवश्यक परवाना असतो तो मिळवण्याकरिता नवीन नियम लागू केलेले असून यासंबंधीची व्यावसायिक पात्रता प्राप्त करण्याकरिता खत बियाणे केंद्रात बारा हजार पाचशे रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल व पंधरा दिवसांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे.

जो व्यक्ती हा अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही त्याला परवाना दिला जाणार नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खत व बियाणे क्षेत्रातील व्यापारी यांना जास्त अनुभव येईल व चांगले विपणन आणि उत्पादन तंत्र देखील ते शिकू शकतील.

आता दहावी उत्तीर्ण तरुण खत आणि बियाण्याचे दुकान उघडू शकणार आहेत. याआधी बीएससी इन अग्रिकल्चर किंवा डिप्लोमा इन अग्रिकल्चर इतके शिक्षण यासाठी आवश्यक होते. तो आता केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे दहावी पास व्यक्ती देखील कीटकनाशक आणि खते व बियाण्याचा व्यवसाय करू शकणार आहात..

याकरिता कृषी विज्ञान केंद्रामध्ये पंधरा दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर एक परीक्षा होईल व ती परीक्षा दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला किंवा तरुणाला प्रमाणपत्र मिळेल. नंतर संबंधित तरुण हे परवान्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts