जॉब्स

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘यूपीएससी’चे मोफत निवासी प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

महाराष्ट्रामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी या पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये राहून कोचिंग क्लासेसच्या मदतीने परीक्षांची तयारी करत असतात.

अशा राज्यातील यूपीएससीची तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांना आता मोफत निवासी प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2025 च्या निशुल्क परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करण्यात आलेली आहे.

 राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार यूपीएससीचे मोफत निवासी प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2025 करिता निशुल्क परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता 28 जून 2024 या तारखेपर्यंत याकरिता अर्ज करता येणार आहे

यासाठीची सामायिक लेखी परीक्षा 4 ऑगस्ट 2024 ला होणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईच्या संचालिका डॉ. स्वाती वाव्हळ यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिले आहे.

 या ठिकाणी करण्यात येणार आहे सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन

यूपीएससी परीक्षा 2025 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक, औरंगाबाद तसेच कोल्हापूर, अमरावती,

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या आयोजन करण्यात आले असून संस्थेने याकरिता जी जाहिरात दिलेली आहे त्यातील नमूद अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून https://www.siac.org.in

या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत.

 याकरिता महत्त्वाच्या असलेल्या तारखा

 ऑनलाइन अर्जाचा अंतिम दिनांक हा 28 जून 2024 आहे.

 परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे.

 लेखी प्रवेश परीक्षा दिनांक 4 ऑगस्ट 2024 आहे.

 विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे केले जातील निश्चित?

1- यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकूण गुणांच्या आधारे ठरवले जाणार आहेत.

2- परीक्षा झाल्यानंतर याकरिता असलेल्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

3- सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जेव्हा जाहीर होईल त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून आवडीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडायचे आहे.

4- महत्त्वाचे म्हणजे प्रवेश प्रक्रिये बाबत असलेली कोणतीही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही.

5- प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच याची सविस्तर जाहिरात तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम व पात्रता तसेच ऑनलाइन अर्ज कसा भरावा यासंबंधीच्या सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts