PCMC Bharti 2024 : पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
-माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन त्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा.
-एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण पाहिजे.
-मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 33 वर्षे आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 17 मे 2024 पर्यंत सादर करावे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करावे दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 मे 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.