जॉब्स

Pune Bharti 2023 : पिंपरी चिंचवड येथे ‘वाहन चालक’ पदाच्या जागांसाठी भरती सुरु; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

MESCO Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड पुणे, येथे सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

ही भरती पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालये आणि फायर पॉईट येथे सुरु आहे. या भरतीसाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख १ सप्टेंबर 2023 आहे. जे उमेदवार येथे नोकरी करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

या भरती अंतर्गत वाहन चालक पदांच्या एकूण ६० जागा भरल्या जाणार असून, पदानुसार शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक असेल, तरी मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी. ही भरती पुण्यात होत असून, उमेदवार मुलाखतीसाठी ‘मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१.’ या पत्त्यावर 1 सप्टेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेत हजर राहू शकतात.

वरील भरती अंतर्गत निवड झाल्यास, आकर्षक मासिक पगार दर महा  ३१,३१४/- रूपये (कपात ३,७००/- रुपये) दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ., कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA) व मॅच्युटीचे फायदे मिळतील. तसेच आठवड्यात एक सुट्टी मिळेल. त्याव्यतिरिक्त सुट्टी लागू नसेल.

ही भरती मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. लक्षात घ्या सदर नेमणुक ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत कागपत्रे आणावीत, या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास, उमेदवार www.mescoltd.co.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. यासह मुलाखतीस हजर राहण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts