जॉब्स

Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात ‘प्राध्यापक’ पदांची भरती सुरु, लवकर करा अर्ज !

Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या विविध रिक्त पदांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. तसेच, अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

येथे अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे PhD degree असणे आवश्यक आहे. ही भरती पुण्यात होत असून ऑफलाईन अर्ज सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ऑफलाईन अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

तर ऑनलाईन अर्ज http://www.unipune.ac.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

असा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
-ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-तर ऑनलाईन अर्ज http://www.unipune.ac.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
-तसेच, अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts