जॉब्स

State Health Society Mumbai : मुंबईतील राज्य आरोग्य संस्था अंतर्गत 08 रिक्त पदांच्या जागेसाठी निघाली भरती, असा पाठवा अर्ज!

State Health Society Mumbai : राज्य आरोग्य संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ निवासी/सल्लागार, प्रकल्प सह-ऑर्डिनेटर आणि समुपदेशक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

Post graduate in Psychiatry or M.D. / B.E. in Engineering, Diploma in Engineering or MCA + experience. / Masters in Clinical Psychology/Social Work or other related disciplines such as MA Sociology/Psychology.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 18 ते 61 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज वैद्यकीय अधीक्षक, रीजनल मेंटल हॉस्पिटल, ठाणे पत्ता:- ज्ञान साधना कॉलेज जवळ, L.B.S रोड वागळे इस्टेट, ठाणे (प) 400604. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.nrhm.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

-उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts