जॉब्स

Mahatma Phule Corporation : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई अंतर्गत ‘वसुली सल्लागार’ पदासाठी भरती सुरु…

Mahatma Phule Corporation Bharti : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, इच्छुकांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे.

वरील भरती “वसुली सल्लागार” पदासाठी होत असून, या अंतर्गत एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक असेल, त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचा. ही भरती मुंबईत होत असून, नोकरी ठिकाण देखील मुंबई आहे, यासाठी ऑफलाईन अर्ज महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयात पोस्टाने पाठवायचे आहे. अर्ज 08 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट mpbcde.maharashtra.gov.in

ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज पूर्ण माहितीसह भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज पाठवावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts