Recruitment News:- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत आता मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून गेल्या कोरोना कालावधीपासून स्थगित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियांना सध्या वेग आल्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळत आहे.
विविध जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या विविध संवर्गातील रिक्त पदे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर काही विभागांमध्ये देखील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या भरतीचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.
याच अनुषंगाने जर पाहिले तर महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून तरुणांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे. याच भरती प्रक्रियेविषयी या लेखात माहिती घेणार आहोत.
राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये असलेल्या विविध कार्यालयातील लघुलेखक( निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, जवान तसेच जवान-नि- वाहनचालक गट क प्रवर्गातील आणि चपराशी( गट ड ) संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे आता नामनिर्देशनाच्या माध्यमातून भरण्याकरिता राज्यस्तरावर स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
महत्वाचे म्हणजे याच विभागातील जवान व जवान-नि-वाहन चालक या पदांची नियुक्ती प्राधिकारी म्हणून आता आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांना घोषित करण्यात आलेले असून हा संवर्ग आता राज्यस्तरीय करण्यात आलेला आहे. या पदभरतीवर अगोदर स्टे अर्थात स्थगिती होती व ती आता उठवण्यात आलेली आहे.
त्यामुळे आता या पदांसाठीची संवर्गीय कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरावर बिंदू नामावली तपासून रिक्त पदे निश्चित करण्यात आलेले आहेत. याकरिता नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून त्यानुसार मंजूर पदे व पदोन्नतीमुळे रिक्त झालेली जी काही पदे आहेत त्यामुळे जवान आणि जवान-नी-वाहनचालक यांच्या पद संख्येमध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यानुसार पदसंख्या
लघुलेखक( निम्न श्रेणी) एकूण पाच पदे
लघु टंकलेखक– एकूण 18 पदे
जवान– एकूण 568 पदे
जवान–नी–वाहनचालक– एकूण 73 पदे आणि चपराशी या पदासाठी 53 पदे
या संवर्गातील भरती प्रक्रिये बाबतचा सविस्तर तपशील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जवान व जवान–नि–वाहनचालक पदांसाठी महत्वाची माहिती
राज्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 मे 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार जवान व जवान-नि-वाहनचालक या पदाकरिता अर्ज केलेला असेल आणि त्यांनी फी भरलेली नसेल तर त्यांना परीक्षा फी भरावी लागणार आहे व अगोदर भरलेल्या अर्जामध्ये ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार आहे.
ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय आहे व त्यामुळे 30 मे 2023 रोजी असलेल्या जाहिरातीला धरून ज्या उमेदवारांनी जवान व जवान-नि- वाहन चालक पदासाठी अर्ज केलेले असेल असे सर्व उमेदवार हे 17 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड देखील राज्यस्तरीय समजण्यात येणार आहे. अशा उमेदवारांना संपूर्ण राज्यामध्ये ज्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल त्या ठिकाणी ती स्वीकारावी करावी लागणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
या भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया ही 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली असून याची शेवटची मुदत एक डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे.