Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार (नियोजन) आणि सल्लागार (नियोजन)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
Degree in Architecture or Post Graduate degree in Town/Urban/City Planning + experience.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज व्यवस्थापक (एचआर), मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mumbaiport.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.