BANK OF BARODA Bharti 2024 : तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
येथे ”अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
जनरल मेडिसिनमध्ये एम.डी. (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त पीजी पात्रता) एमबीबीएसची एमडी बेसिक पात्रता उत्तीर्ण केल्यानंतर किमान तीन वर्षांचा अनुभव आणि एमबीबीएस होमिओपॅथी डॉक्टर मान ५ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा
या पदांसाठी वयोमर्यादा 55 वर्ष इतकी आहे. यापुढील उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वरील पदांसाठी अर्ज मुख्य व्यवस्थापक, [HRM-OA), बँक ऑफ बडोदा. झोनल ऑफिस, लखनौ, “बडोदा हाउस” तिसरा मजला, V-23, विभूती खंड, गोमती नगर.. लखनौ-226010, या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 28 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास www.bankofbaroda.in ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, लक्षात घ्या अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील जोडावीत.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जहिरात सविस्तर वाचावी.