MCA Affairs Bharti 2024 : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील यासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पद्धतीनुसार आपले अर्ज सादर करावे.
वरील भरती अंतर्गत “तरुण व्यावसायिक” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
Chartered Accountant /Company Secretary/ Cost Accountants
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 35 वर्ष इतकी आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज rd.west@mca.gov.in या ईमेलद्वारे पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज प्रादेशिक संचालक कार्यालय, पश्चिम क्षेत्र, एमसीए, मुंबई, 5 वा मजला, “एव्हरेस्ट” इमारत, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, मरीन ड्राइव्ह, मुंबई 400 002 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 26 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mca.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन सादर पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.
-सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.