जॉब्स

Sarkari Yojana: तरुणांनो सरकारच्या ‘या’ योजनांचा फायदा घ्या आणि स्वतःचा व्यवसाय उभारा! वाचा योजनांची माहिती

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. तसेच आजकालच्या तरुणांचा विचार केला तर नोकऱ्यांची उपलब्धता अगदी नगण्य असल्यामुळे व त्या तुलनेत दरवर्षी विद्यापीठातून पदव्या घेऊन बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींची संख्या मात्र काही लाखात आहे.

त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीची समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. या समस्येवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अनेक योजनांची आखणी केलेली असून या योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळावा व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे

या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा म्हणून केंद्र सरकारच्या या योजना फायद्याच्या ठरताना दिसून येत आहेत. नेमक्या या योजना कोणत्या? याबाबतची माहिती आपण अगदी थोडक्यात घेणार आहोत.

 सरकारच्या या योजना तरुणांसाठी ठरत आहेत फायद्याच्या

1- पंतप्रधान रोजगार योजना बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची उपलब्धता व्हावी या उद्देशाने पंतप्रधान रोजगार योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा म्हणून सरकार मदत करते. या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी व्याजदरावर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत प्रशिक्षणाकरिता संबंधित तरुणांना बोलावले जाते व हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकार कर्ज पुरवठा करते. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे.

2- आत्मनिर्भर भारत योजना कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांचे व्यवसाय बंद पडले होते व मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. या विपरीत परिस्थितीमध्ये तरुणांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायापासून ते नोकरीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात आलेले आहेत. व्यवसाय उभारण्यासाठी तरुण आत्मनिर्भर भारत योजनेचा देखील लाभ घेऊ शकतात.

3- प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून तरुणांना आणि लघु उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.

यामध्ये कर्जाच्या तीन श्रेणी असून तुम्हाला या श्रेणीच्या माध्यमातून 50000 हजार पासून तर दहा लाख रुपयापर्यंत मुद्रा कर्ज मिळते. त्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.

4- पीएम वाणी योजना केंद्र सरकार सध्या प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने प्रयत्न करत असून या कालावधीत इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. याच दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम वाणी योजना सुरू करण्यात आलेली आहे. पीएम फ्री वाय-फाय योजनेमुळे सार्वजनिक वायफाय चे नेटवर्क विस्तारले असून याचा देखील फायदा तरुणांना अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts