SBI Bank Recruitment : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर बँकिंग एक्झाम साठी देशातील लाखो तरुण-तरुणी तयारी करत आहेत. जर तुम्हीही बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असाल तर एसबीआय मध्ये निघालेली ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी राहणार आहे.
एसबीआयमध्ये तब्बल 1511 रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली असून यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे. या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करावे लागणार आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की कोणत्या पदांसाठी अन किती जागांसाठी ही भरती होणार, यासाठी कोणते उमेदवार पात्र ठरणार, अर्ज कसा करावा लागणार, अर्ज करण्याची शेवटची दिनांक अशा वेगवेगळ्या बाबींची आता आपण माहिती पाहणार आहोत.
कोणत्या आणि किती रिक्त जागांसाठी होणार भरती?
एसबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या जागा भरल्या जाणार आहेत. या अंतर्गत बँकेच्या विविध विभागातील डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या जवळपास 1511 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जातील.
या भरतीच्या माध्यमातून डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – प्रोजेक्ट मॅनेजमेंट- 187 पदे, डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – इंफ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन – 412 पदे, डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – 80, डिप्टी मॅनेजर (सिस्टम) आयटी – आर्किटेक्ट – 27, डिप्टी मॅनेजर (सिस्टम) इन्फॉर्मेशन सेक्युरिटी – 7, असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) – 784 आणि बॅकलॉग व्हॅकंसी- असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) – 14 पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
वर सांगितलेल्या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बदलणार आहे. यामुळे शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक ची माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक राहणार आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचं झालं तर असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) आणि बॅकलॉग व्हॅकंसी- असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) या दोन पदांसाठी 21 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहतील आणि उर्वरित सर्व पदांसाठी 25 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
उमेदवारांची निवड कशी होणार
निवडीबाबत बोलायचं झालं तर असिस्टंट मॅनेजर सिस्टम या पदासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे. तसेच उर्वरित पदांसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग-कम-टायर्ड/लेयर्ड इंटपॅक्शन तत्त्वावर केली जाणार आहे.
सुरुवातीचा एक वर्ष प्रोबेशन पिरियड
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचा एक वर्ष प्रोबेशन पिरियड अंतर्गत नोकरी करावी लागणार आहे. या सुरुवातीच्या एका वर्षाच्या काळात सदर नियुक्त उमेदवारांच्या कामकाजाचे मूल्यमापन होईल. यानंतर मग स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर म्हणून पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
बॉण्ड म्हणून पैसे भरावे लागतील
मिळालेल्या माहितीनुसार या पदभरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) ग्रेड – JMGS-I या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दोन लाख रुपयांची रक्कम बॉंड म्हणून भरावी लागणार आहे. एवढेच नाही तर या उमेदवारांना पाच वर्ष बँकेत काम करणे कंपल्सरी राहणार आहे.
अर्ज कुठे करावा लागणार?
मिळालेल्या माहितीनुसार या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. ही अर्ज प्रक्रिया कालपासून अर्थातच 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. sbi.co.in किंवा bank.sbi/web/careers/current-openings या वेबसाईटवर जाऊन इच्छुकांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे.