SBI Banking Job : तुमचेही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे का ? अहो, मग तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर, भारतात लाखो तरुण-तरुणी बँकिंग परीक्षेसाठी तयारी करतात. बँकेत नोकरी करण्याची इच्छा उराशी बाळगून लाखो तरुण-तरुणी अहोरात्र परीक्षेची तयारी करत आहेत.
जर तुम्हीही बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असाल तर तुम्हाला एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. एसबीआय बँकेने विविध पदांसाठी नुकतीच भरती जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे एसबीआयच्या या पदभरती अंतर्गत कोणत्याही परीक्षाविना उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
यासाठीची अधिसूचना देखील बँकेकडून निर्गमित झाली असून यासाठीची अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण एसबीआय बँकेच्या या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
एसबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बँकेत डेप्युटी वीसी (आयटी आर्किटेक), असिस्टंट विसी, सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट वाइस प्रेसिडंट या पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. म्हणजेच बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती जागांसाठी होणार भरती
वर नमूद केलेल्या पदांच्या एकूण 58 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार असल्याची माहिती अधिसूचनेतून समोर आली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
एसबीआय बँकेच्या या पदभरतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता देखील पदानुसार वेगवेगळी आहे. यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबतची सविस्तर माहिती तुम्ही एसबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेऊ शकता. या धरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षे एवढे निश्चित करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक वय असणाऱ्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार नाही.
पगार किती मिळणार?
या पदभरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 35 लाखांपासून ते 45 लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक पगार दिला जाणार आहे. म्हणजे कमाल तीन लाख 75 हजार रुपये महिना एवढा पगार मिळणार आहे.
अर्ज कुठं करणार?
या पद भरतीसाठी इच्छुक अन पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तथापि, विहित मुदतीत अर्ज सादर झालेल्यांनाच या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.